खेड:- खेडमधील देवघर बंदरवाडी येथे दुचाकी अपघातात झालेल्या मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज रमेश मोरे (25, देवघर, बंदरवाडी, खेड) असे मृत्यू झालेल्या आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज मोरे हा आपल्या ताब्यातील यामाहा एफ झेड दुचाकीवरुन देवघर बंदरवाडी ते खेड असा चालला होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात असलेल्या सुरजचा गाडीवरील ताबा सुटला. त्याची गाडी रस्त्याच्या बाहेर जावून झाडावर आदळली. डोक्यात हेल्मेट परिधान केलेले नसल्यामुळे सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीचे मोठ्या पमाणात नुकसान झाले. या अपघातात स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यापकरणी सुरज मोरे याच्यावर भादविकलम 304 (अ), 279, 337 मोटर वाहन कायदा कलम 184, 146/196, 129/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे