स्थानिक बाजारपेठेत खरेदी करा, मिळवा आकर्षक बक्षिस; ऑनलाईन मार्केटला टक्कर देण्यासाठी नवा फंडा 

रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित दसरा-दिवाळी-नाताळ भव्य बक्षीस योजना

रत्नागिरी:- कोरोनामुळे लागलेला लॉकडॉऊन आणि ऐन सणासुदीच्या कालावधीत ऑनलाइन शॉपिंगमुळे बसणारा फटका यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी महासंघाने नवा मार्ग काढला आहे. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून दसरा-दिवाळी-नाताळ अशी भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत ग्राहकांना तब्बल 15 लाखांची बक्षीस देण्यात येणार आहेत. या आठवड्यात ऍक्टिवा गाडी आणि टीव्ही तर नाताळ सणापर्यंत दर आठवड्याला बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला मारुती वॅगन आर ही चारचाकी गाडी दिली जाणार आहे. 

लॉकडाऊनमुळे मागील 2 वर्ष स्थानिक व्यापारी मंदी मुळे फार मेटाकुटीला आले आहेत.त्यात भर म्हणून ऑनलाईन शॉपिंगचे भूत स्थानिक व्यापार्यांचा मानगुटीवर बसले आहे. रत्नागिरी शहरातील स्थानिक व्यापारी यांचा कडून लोकांनी खरेदी करावी व स्थानिक व्यापाऱ्यांला प्रोत्साहन मिळावे यासाठी हमखास बक्षीस योजना रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 15 लाख रुपये किंमतीची बक्षिस देण्यात येणार आहेत.या बक्षीस योजने अंतर्गत येणाऱ्या दसऱ्या पर्यंत बक्षीस योजने अंतर्गत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या  आठवड्यातच ऍक्टिवा गाडी, टीव्ही इत्यादी बक्षीस मिळणार आहेत. त्याच प्रमाणे नाताळपर्यंत दर आठवड्याला मोठे बक्षीस ग्राहकांना देण्यात येणार आहे. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित या बक्षीस योजने अंतर्गत खरेदी करणाऱ्या ग्राहकावर असंख्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. मारुती वॅगन-आर चार चाकी गाडी हे  प्रथम क्रमांकाच बक्षीस योजने अंतर्गत भाग्यवान ग्राहकाला मिळणार आहे.

त्याच सोबत खूप सारे बक्षीस शहरातील व्यापाऱ्यांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन कडे न वळता स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी ह्यासाठी ही योजना रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून जाहीर करण्यात आली आहे. ह्या योजने चा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा व महाबक्षीस योजनेतून लाखो रुपयांची बक्षीस जिंकवी.