स्टेट बॅंक कॉलनी येथे मोटारीची दुचाकीला धडक; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते साळवी स्टॉप रस्त्यावरिल स्टेट बॅंक कॉलनी फाट्यावर मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वार जखमी झाला. शहर पोलिस ठाण्यात संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्य मरीबा ईबिद्रे (रा. समर्थ अपार्टमेंट महालक्ष्मीनगर, खेडशी, रत्नागिरी) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास स्टेट बॅंक कॉलनी रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी सुरज जयंवत रांबाडे (वय २४, रा. शांतीनगर, रसाळवाडी, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एडब्ल्यू ८१३६) घेऊन चर्मालय ते साळवीस्टॉप असे जात असताना स्टेट बॅंक कॉलनी फाटा रस्त्यावर साळवी स्टॉप कडून येणाऱी मोटार (क्र. एमएच-०८ एजी ३०८८) वरिल चालकाने मोटार निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुरज रांबाडे जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.