रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथील वृध्देने अज्ञात कारणातून तेथील नदीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 3 मे रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास उघडकीस आली.
राधाबाई कृष्णा मांडवकर (75, रा. मांडवकरवाडी सोमेश्वर, रत्नागिरी) असे आत्महत्या करणार्या वृध्द महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, शुक्रवार 3 मे रोजी त्यांच्या आईने अज्ञात कारणातून सोमेश्वर पुलावरुन नदीत उडी घेत आत्महत्या केली. सायंकाळी 5.30 वा. सुमारास त्यांचा मृतदेह सोमेश्वर सती वाडीच्या खालच्या बाजुस मिळून आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.