रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर गुरववाडी येथील युवक मयूर भीतळे याने गणेशोत्सवात गोवर्धन पर्वताचा देखावा साकारला आहे. देखावा साकारताना त्याने गृहपयोगी वस्तूंचा वापर केला आहे. अतिशय नियोजनबद्ध सजावटीमुळे हा देखावा अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.
घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. वर्षभर वाट पाहिल्यानंतर बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकजण तयारी करतात. मात्र फारच कमीजण सोमेश्वर मधील मयुर भीतळे प्रमाणे तयारी करतात. मागील तीन वर्षांपासून मयूरचे देखावे पंचक्रोशीसह तालुक्यात पसंतीला उतरत आहेत. यावर्षी मयूरने गोवर्धन पर्वत करंगळीवर पेळणाऱ्या कृष्णाचा देखावा साकारला आहे.
अगदी घरगुती वस्तूंचा वापर करून हा देखावा मयूरने अगदी हुबेहूब साकारला आहे. देखावा पाहताच याची सत्यता प्रत्येकाच्या नजरेत भरेल असा हा देखावा आहे. कृष्णाची मूर्ती सोबत बाप्पा आणि कृष्णाच्या एका करंगळीवर पर्वत. या पर्वताखाली समस्त जीव वर्ग हा अनोखा देखावा मयूर याने साकारला आहे. सोमेश्वर गावसह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांना या देक्याव्याची भुरळ पडली असून या गणेशोत्सवात हा देखावा आकर्षणाचा विषय ठरत आहे.