सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

चिपळूण:- कारगिल युध्द, ऑपरेशन पराक्रम मोहीम, सुदानमधील शांती सेनेचे प्रतिनिधीत्व केलेले आणि भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना भूस्खलनात हुतात्मा झालेले तालुक्यातील मोरवणेचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे यांचे पार्थिव सोमवारी गावात आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर घरापासून जवळच असलेल्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने ग्रामस्थ व प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. मागील आठवड्यात २७ मार्च रोजी सकाळी ८.१० वाजता तवांगजवळील जिमिथान येथे झालेल्या भूस्खलनात सुभेदार ढगळे हे हुतात्मा झाले.