दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड आंबवली मार्गावरील घटना

खेड:- तालुक्यातील आंबवली मार्गावरील सुकीवलीनजीक तीव्र उतारावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला असून, प्रकाश रामचंद्र कदम (६२, रा. पुणे) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.

प्रकाश कदम हे शुक्रवारी सकाळी दुचाकीने खेडहून आंबवलीच्या दिशेने जात होते. ते सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान सुकिवलीनजीकच्या उतारावर आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्याना गंभीर दुखापत झाली.

काही स्थानिकांनी कदम यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. खेड पोलिस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.