रत्नागिरी:- वाढत्या महागाईमुळे गोरगरिब, मध्यवर्गीय
महिलांना खासगी हॉस्पीटलमध्ये प्रसूती परवडत नसल्यामुळे रत्नागिरीमधील सिव्हील हॉस्पीटलमध्ये महिला प्रसूतीसाठी प्राधान्य देत आहेत. वर्षभरात तब्बल ३ हजारांहून अधिक महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. विशेष म्हणजे सिझर ऐवजी नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण सिव्हील हॉस्पीटलमध्ये वाढले आहे. तर पाच वर्षात १४ हजारांहून अधिक गरोदर महिलांच्या प्रसूती झालेल्या आहेत. एकंदरीत, गरीब, गरोदर महिलांचा सिव्हील हॉस्पीटल आधार बनले आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरिब, मध्यमवर्गीय महिला आता प्रसूतीसाठी खासगीऐवजी सिव्हील हॉस्पीटलला पसंती देत आहेत. वाढत्या महागाईमुळे खासगी हॉस्पीटलमध्ये इलाज करणे परवडत नाही. खासगी रुग्णालयामध्ये लाखों रूपये खर्च येतो तसेच खासगी दवाखान्यात सिझर प्रसूती मोठ्या प्रमाणात करण्यात होत असल्यामुळे महिला सिव्हीलला हॉस्पीटल प्रसूतीसाठी जात आहेत. एकीकडे इतर जिल्ह्यात खासगीसह सिव्हील हॉस्पीटलमध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढत असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र परिस्थित वेगळी असून सिव्हील हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे गरोदर मातांची नैसर्गिक प्रसूती वाढली आहे तर सिझेरियनचे प्रमाण कमी होत असल्याचे आकडेवारीरून दिसून आले आहे. त्यामुळे गोरगरिब, मध्यवर्गीय महिला प्रसूतीसाठी सिव्हीलकडे वळू लागल्या आहेत.
सिव्हील हॉस्पीटलमध्ये नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढत चालले आहे. मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता ४ हजार ९८६ इतक्या प्रसूती सिझर झालेल्या आहेत तर ८ हजार ९५० इतक्या प्रसूती नैसर्गिक झालेल्या आहेत.









