रत्नागिरी:- सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांना परिवहन विभागाने चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्यात परिवहन अधिकारी यांनी १२९ वाहन चालकांचे परवाने निलंबित केले असून पोलिस विभागाकडून १५१ परवाने निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात सिग्नल तोडून नियम मोडणाऱ्या २८६ केसेस पोलीस दलाकडून दाखल करण्यात आल्या होत्या. काहींनी भरधाव जावून अपघात केले होते . काहींनी सिग्नल तोडले होते. काहींनी विरुद्ध दिशेने वाहने चालविली होती. अशा विविध कारणास्तव परवाना निलंबनाचे प्रस्ताव पोलिसांकडून दाखल केले जातात. परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली होती. सध्याचे नूतन आरटीओ यांनी अत्यंत कौशल्याने यावर निर्णय घेतले. यापुढे आरटीओचे कोणतेही नियम वाहनधारकांनी तोडू नये , असे आवाहनही त्यांनी केले आहे .









