Tuesday, September 1, 2026
spot_img
Home क्रीडा सावर्डेच्या गणेश गोसावीने पटकावला ‘राधाकृष्ण श्री-२०२६’चा मानाचा किताब

सावर्डेच्या गणेश गोसावीने पटकावला ‘राधाकृष्ण श्री-२०२६’चा मानाचा किताब

सोहम कुर्टेने जिंकला ‘राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६’चा किताब

रत्नागिरी:- गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी व वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत सह्याद्री कॉलेज जिम, सावर्डे-चिपळूणचा गणेश संजय गोसावी याने आपल्या दमदार शरीरयष्टी व उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ हा मानाचा किताब पटकावला.

यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६’ ही स्पर्धा. या स्पर्धेचा किताब सुहास फिटनेस, रत्नागिरीचा सोहम अनंत कुर्टे याने पटकावला.

वैश्य युवा संस्था रत्नागिरीकडून गेल्या पाच वर्षांपासून जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ८६ शरीरसौष्ठवपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. दापोली, खेड, चिपळूण, सावर्डे, राजापूर तसेच रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील शरीरसौष्ठवपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्पर्धेची रंगत वाढवली. टायटल विनर ठरला सोहम अनंत कुर्टे, सुहास फिटनेस, रत्नागिरी. शॉर्ट ग्रुप प्रथम क्रमांक सोहम अनंत कुर्टे सुहास फिटनेस, रत्नागिरी. प्रथम क्रमांक – दिशांत अच्युत कांबळे क्रिडा संकुल रत्नागिरी याने पटकावला

राधाकृष्ण श्री-२०२६ गटवार निकाल शॉर्ट ग्रुप प्रथम क्रमांक कहाफा कासम हुनेरकर फिनिक्स हार्डकोअर जिम, रत्नागिरी, मिडियम ग्रुप प्रथम रूपेश बंडू गोधडे राजबिंडा फिटनेस, खेड. टॉल ग्रुप प्रथम गणेश संजय गोसावी सह्याद्री कॉलेज जिम, सावर्डे, चिपळूण. सुपर टॉल ग्रुप प्रथम सौरभ नरेश भोंगले इलाईट जिम, रत्नागिरी. विशेष पुरस्कार राधाकृष्ण श्री-२०२६ किताब विजेता गणेश संजय गोसावी सह्याद्री कॉलेज जिम, सावर्डे, चिपळूण. उगवता तारा शार्दुल संजय टाकले श्रीदेवी करंजेश्वरी जिम, चिपळूना बेस्ट पोझर
संजय शिवाजी डेरवणकर इंडियन जिम, चिपळूण.

स्पर्धा पूर्ण होताच विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ किताब विजेते गणेश संजय गोसावी यांना श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था उपाध्यक्ष श्री. विरेंद्र शेठ वणजू यांच्या हस्ते मानाचा पट्टा परिधान करण्यात आला तसेच रोख पारितोषिक देण्यात आले. आकर्षक शिल्ड श्री. अभिज्ञ वणजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‘राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६’चे विजेते सोहम अनंत कुर्टे यांना नगरसेवक श्री. केतन उमेश शेट्ये यांच्या हस्ते मानाचा पट्टा परिधान करण्यात आला. आकर्षक शिल्ड श्री. सुयश शेट्ये यांच्या हस्ते, तर रोख पारितोषिक श्री. रेडिज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच बेस्ट पोझर व उगवता तारा या विशेष पुरस्कारांचे वितरण स्पर्धा प्रमुख श्री. ऋषी धुंदुर, श्री. मुकुल मलुष्टे व श्री. सचिन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सदानंद जोशी, सेक्रेटरी श्री. जितेंद्र नाचणकर, ज्येष्ठ संघटक श्री. शैलेश जाधव सर, खजिनदार श्री. प्राध्यापक अंकुश कांबळे सर, आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर , असोसिएशनचे पदाधिकारी श्री. नंदकुमार शिंदे सर, जिल्हा संघटक श्री. फैय्याज खतीब तसेच असोसिएशनचे पदाधिकारी आणि वैश्य युवा संस्थेचे वेदांग मलुष्टे, हर्षद रेडिज, कुंतल खातू, नरेंद्र वणजू , श्री. कोलगे, मिलिंद दळी, कृष्णा दळी, सुनील बेंडखळे, मनोर दळी, इंद्रनील रेडिज आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. गौतम बाष्टे यांनी केले.

जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक, पदाधिकारी, परीक्षक, सहकारी व सर्व सहभागी खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.