साळवी स्टॉप येथे श्री साई समाराधना उत्सवाचे आयोजन

रत्नागिरी:- साळवी स्टॉप येथे अखंड सौभाग्यवती सुमित्राबाई दत्ताजी कदम प्रतिष्ठान यांच्यावतीने ओम साई मंदिर येथे श्री साई समाराधना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २६ डिसेंबर पासून हा उत्सव सुरू होणार असून गुरुवार २८ डिसेंबर पर्यंत हा सोहळा चालणार आहे.

श्री साई समाराधना उत्सवाचे आयोजन दरवर्षी साळवी स्टॉप येथे करण्यात येते. यावर्षी मंगळवार २६ डिसेंबर पासून हा सोहळा सुरू होत आहे. यावर्षी या सोहळ्याचे ४३ वे वर्ष आहे. मंगळवारी सकाळी दत्त जयंती निमित्त ९.३० ते ११.३० या वेळेत दुग्धाभिषेक, महापूजा, हवन व आरती हे कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १ र २.३० या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत नाचणे येथील लिंकेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन होणार आहे. सायंकाळी सात वाजता आरती, प्रार्थना व खिचडी प्रसाद वाटप होणार आहे.

बुधवार २७ डिसेंबर रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत दत्त माऊलींच्या मूर्तीवर नऊ धान्यांचा अभिषेक, यांनतर महापूजा, हवन व आरती होणार आहे. दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत बागेश्री महिला मंद्दल नाचणे येथील भजन मंडळाचे भजन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती, प्रार्थना व खिचडी प्रसादाचे वाटप होणार आहे.

गुरुवार २८ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती व साईंची नित्यपुजा होईल. सकाळी ९.३० रे ११.३० या वेळेत जलाभिषेक महापूजा तसेच हवन व पूजा, दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत तुळजाभवानी महिला मंडळ माळनाका यांचे भजन, सायंकाळी सात वाजता आरती, प्रसाद, खिचडी वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.