साळवी स्टॉप ते मारुती मंदिर दांडा फिशरीज कंपनी मिरकरवाडा एका लेनवरील वाहनांना प्रवेश बंद

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर – दांडा फिशरीज कंपनी मिरकरवाडा रोडचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता एका लेन वरील वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत.

शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर – दांडा फिशरीज कंपनी मिरकरवाडा रोड रस्त्याचे एका लेनचे काम चालू असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करुन साळवी स्टॉप ते मारुती मंदिर – दांडा फिशरीज कंपनी मिरकरवाडा रोडचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता एका लेन वरील वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

वाहतूक कोंडी होवू नये याकरिता वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा ते पुढीलप्रमाणे आहेत. अवजड वाहनचालकांनी मिऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर हायवे रोडचा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. शहरातील वाहनचालकांनी मारुती मंदीर रत्नागिरी –नाचणे – पोमेंडी रोडचा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. वाहनचालकांनी मारुती मंदिर रत्नागिरी –मजगांव – मिरजोळे रोडचा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. शिरगाव –परटवणे- भाट्ये- पावस सागरी मार्गाचा अवलंब करावा. तसेच वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.