साळवी स्टॉपसह चंपक मैदान येथे मद्य प्राशन करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- विनापरवाना हातभट्टी व विदेशी मद्य प्राशन करणे, जवळ बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. शहर व ग्रामीण भागात पोलिसांचा वचक असूनही सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणे जवळ बाळगणे अशा घटना समोर येत आहेत. शनिवारी शहरातील साळवी स्टॉप येथील स्वमिंग पुल परिसरात तसेच चंपक मैदान येथे मद्य प्राशन करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांकडून दारु जप्त केली आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र शहर व ग्रामीण परिसरात दिसत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. १७) दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळात पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत शहर पोलिसांनी संशयित अनिल चंद्रकांत गुरव (रा. गुरववाडी, हातखंबा) हे मद्य प्राशन करताना आढळले तर अनंत जानु घाणेकर (रा. देवुड, रत्नागिरी) व रियाज अब्बास मुकादम (रा. कोकण नगर-रत्नागिरी) या तिन संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना निदर्शनास आले. तर देवुड येथील संशयित अनंत घाणेकर हे गावठी हातभट्टीची पाच लिटर दारु विक्री करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तर पोलिस हेड कॉन्स्टेबल रोशन सुर्वे, पोलिस कॉन्स्टेबल राहूल चव्हाण यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. तक्रारीवरुन पोलिसांनी तिन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.