सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- न्यायालय ते भाट्ये ब्रीज जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोक बद्रीप्रसाद तिवारी (२६, रा. फतेहपूर पहाडपूर राज्य उत्तर प्रदेश, सध्या भाट्ये चेकपोस्ट समोर भाट्ये, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना शनिवारी (ता. ३) दुपारी दोनच्या सुमारास न्यायालय नाका ते भाट्ये ब्रीज रस्त्यावर पोस्ट ऑफिसच्या समोरील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अलोक हा सार्वजनिक ठिकाण मद्य प्राशन करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.