सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहारानजीकच्या कारवांचीवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी कोरोना काळात तोंडाला मास्क न लावल्या प्रकरणी एकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 2 जून रोजी दुपारी 11.20 वा. करण्यात आली.

मलकप्पा गिरीश प्रभाकर (48,रा.पारसनगर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे.त्याने कोरोना संसर्गात रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये असताना सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता हयगईच कृत्य केल्याप्रकारणी ही कारवाई करण्यात आली.