राजापूर: कोदवली येथे सायबाच्या धरणामध्ये बांधण्यात येणाऱ्या नव्या धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा होणार असून त्यातून भविष्यामध्ये शहरातील पाणीक्षमता अधिक सक्षम होणार आहे.
मात्र, सद्यःस्थितीमध्ये धरणामध्ये शेकडो क्युबिक झालेला गाळाचा संचय संभाव्य पाणीसाठ्याच्या उद्दिष्टामध्ये अडथळा ठरून हे संभाव्य पाणीपुरवण्याचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील गाळसंचयाचे सर्वेक्षण करून त्याचा तातडीने उपसा करणे गरजेचे आहे.
नादुरुस्त असलेल्या धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असून गाळाचा संचय झाला. सद्यःस्थितीमध्ये नादुरुस्त असलेल्या या धरणाच्या ठिकाणी नवीन धरणाचे बांधकाम सुरू असून
यापुर्वी नागरी क्षेत्रातील पाणीटंचाई निवारणातर्गंत उपलब्ध झालेल्या निधीतून धरणातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. या गाळ उपशामुळे सुमारे ४.७४ दशलक्ष लिटर पाणी वाढल्याचा त्या वेळी अंदाजही व्यक्त केला होता. त्यातच साचलेल्या गाळामुळे बंद झालेले नैसर्गिक झरेही मोकळे होऊन धरणातील पाण्याची पातळी वाढली होती.