Sunday, June 28, 2026
spot_img
Home चिपळूण सायकलवरून पडून वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू

सायकलवरून पडून वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू

चिपळूण:- चिपळूण तालुक्यात एका दुर्दैवी अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृतक अनिल ग्लेन डिसोजा (वय ५३, रा. भायखळा, मुंबई) हे दिनांक २६ जून २०२६ रोजी गांग्राई (ता. चिपळूण) परिसरात होते. सायंकाळी ५:३५ वाजेच्या सुमारास तेथील एका मुलाची सायकल चालवत असताना, रस्त्यावरील उतारामुळे त्यांचे सायकलवरील नियंत्रण सुटले. या वेळी सायकलचा तोल जाऊन ते रस्त्यावर जोरात आदळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती विजय विठ्ठल भागडे यांनी चिपळूण पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.