सामूहिक आरती पडली महागात; गावखडीत 22 जण क्वारंटाईन

रत्नागिरी:-  सामूहिक आरती आपली प्रथा आहे असे म्हणत सामूहिक आरती करणे महागात पडले असून वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावखडीत सामूहिक आरतीसाठी गेलेल्या २२ जणांवर क्वारंटाईन व्हायची वेळ आली आहे.

कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र गणेश आगमन मिरवणुका, विसर्जन मिरवणुका यासह सामुहिक आरती करण्यावर बंदी घालण्यात आली होती. सोशल डिन्स्टींगचे पालन व्हावे यासाठी सामूहिक आरतीवर बंदी घातली होती. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी त्याचे उल्लंघन करण्यात आले.

गावागावात सामूहिक आरती करण्याची प्रथा परंपरा आहे. मात्र कोरोनाचे सावट अधिक गडद झाले असताना सामूहिक आरती करु नये असे आदेश होते. मात्र सामूहिक आरती आपली प्रथा परंपरा आहे असे म्हणत गावखडी परिसरात सामूहिक आरतीचा कार्यक़्रम पार पडला. ज्या घरात सामूहिक आरती झाली होती त्याच घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला त्रास होऊ लागला आणि आरती झाल्याच्या दुसर्‍या दिवशी पती-पत्नी रुग्णालयात दाखल झाली. यातील त्या जेष्ठ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गावात एकच घबराट पसरली.त्या व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले होते त्याची माहिती आरोग्य विभागाने घेतली. त्यवेळी माझ्या घरात सामूहिक आरती झाली. या आरतीसाठी गावातील २२ तरुण सहभागी झाले होते अशी माहिती दिल्याने आरोग्य विभागातील कर्मचारीदेखील चांगलेच हादरले.

त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरी आरतीसाठी गेलेल्या तरुणांची यादी तयार करण्यात आली आणि त्यांचा शोध घेतला. त्या सार्वंना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र एकाच वेळी २२ जण होम क्वारंटाईन झाले, त्यातील काही तरुण नोकरी व्यवसाय करीत असल्याने त्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाचे आदेश असतानाा देखील हे आदेश धुडकावून सामूहिक आरती करणे या तरुणा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.