सात महिन्यात शहर पोलीस स्थानकाला मिळाले नवे पोलिस निरीक्षक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला अवघ्या सात महिन्यात नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदावर आता विवेक पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक पाटील हे यापूर्वी सागरी सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

सतीश शिवरकर यांची पालघरहून रत्नागिरी पोलिस निरीक्षक पदी सात महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. या काळात त्यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात तसेच मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम तोडतानाचा बंदोबस्त करताना चोख कामगिरी पार पाडली होती. तसेच शहरातील 13 जणांना तडीपार करण्यात, तीन घरफोड्या उघड करण्यात त्यांना यश आले.