साखरतर येथे मासेमारी शेड आगीत जळून खाक 

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील साखरतर पुलाखाली आगीत मासेमारी शेड जळून खाक झाली. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. शेडसह शेडमधील मासळीचे बॉक्स आणि पेट्या देखील जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. साखरतर येथील नौशाद राजपुरकर यांच्या मालकीची शेड आहे. साखरतर मोठे बंदर असल्याने या बंदरानजीक पुलाजवळ मासेमारी शेड उभारण्यात आल्या आहेत. या शेडमध्ये माल साठवून ठेवला जातो. 
 

सोमवारी मासे साठवणूक करणाऱ्या शेडला आग लागली. अचानक आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. या आगीत मासेमारी शेड पुर्ण पणे जळून खाक झाली. स्थानिक जागृत ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. वेळीच आग आटोक्यात आल्याने आजुबाजुला ही आग पसरली नाही. या आगीत नौशाद राजपुरकर यांची मासेमारी शेड जळून खाक झाली. शेड मधील मासळी साठवण्याचे बॉक्स आणि टब देखील जळाले. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आलेली नाही.