रत्नागिरी:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये डॉ. जे. जे.मगदुम आर्युवेद मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये जयसींगपूरच्या डॉ. जे. जे. मगदुम ट्रस्ट संचालीत डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलची विद्यार्थीनी कु. रुहतबी रीयाज मिरकर हिने यश संपादन करून संपूर्ण राज्यात पाचवा क्रमांक पटकवला आहेे.
रुहतबी मिरकर ही मूळची रत्नागिरी तालुक्यातील साखरतर या गावातील विद्यार्थिनी आहे. शाळेच्या प्राथमिक टप्प्यापासून तिने विविध परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे.
रुहतबीने हिने नुकत्याच झालेल्या उन्हाळी 2019 च्या विद्यापीठीय प्रथम वर्षाच्या अंतीम परिक्षेत 1हजार 50 गुणांपैकि एकूण 802 गुण प्राप्त करून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठात पाचव्या क्रमांकाची मानकरी झाली आहे.विद्यापिठाच्या 22 व्या पर्धापन दिनामध्येे रुहतबी हिला मेरीट सर्टीफीकेट देण्यात आले आहे. विद्यार्थीनीच्या या यशाबद्दल डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व संस्थेच्या उपाध्यक्षा तथा जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगरसेविका ऍड. सोनाली मगदूम, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे सीईओ डॉ. दिपक मुगदल, कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद वुटुक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.