रत्नागिरी:- साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीची टीम त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असं अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे याप्रकरणात आता सदानंद कदम यांची चौकशी सुरू झाल्याने अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे.