साई रिसॉर्ट प्रकरणी आ. अनिल परब, सदानंद कदम यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर 

दापोली:- साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी दापोली न्यायालयाने ठाकरे गटाचे नेते अनिल परब व उद्योजक सदानंद कदम यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. साई रिसॉर्ट बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचा या दोघांवर आरोप आहे. या सुनावणीसाठी हे दोघेही दापोली न्यायालयात हजर होते.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे अनिल परब व सदानंद कदम यांना दिलासा मिळाला आहे. यावरी पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड, ना – विकास क्षेत्र परिसरात साई रिसॉर्ट बांधल्याच्या संबंधात भारत सरकारच्या याचिकेनुसार अनिल परब तसेच सदानंद कदम यांना दापोली येथील न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आता न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी दि. २३ फेब्रुवारी २०२३ ही तारीख दिली आहे.