सांडपाणी, कचरा नियोजनासाठी 19 गावांना 25 लाखाचा निधी 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उपक्रम 

रत्नागिरी:-स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील 19 गावांना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी 25 लाख 70 हजार 895 रुपयांचा निधी वितरीत केला आहे. जागतिक बँकेकडून प्रोत्साहन अनुदानांतर्गत हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जीवनमानाचा दर्जा सुधारणे हे उद्दीष्ट आहे. यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. या मिशनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 50 गावांचा समावेश केला आहे. त्यानुसार जागतिक बँकेच्या साह्याने जिल्हास्तरावर सर्वसाधारण घटकांतर्गत 59 लाख रुपये तर अनुसूचित जाती घटकांतर्गत 1 कोटी 11 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत प्राप्त अनुदानातील शिल्लक निधी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरिता वापरावयाचा आहे. जागतिक बँकेच्या प्रोत्साहन अनुदानांतर्गत 25 लाख 70 हजार 895 रुपयांचा निधी पंचायत समितीला वितरीत करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.