चिपळूण:- सेटिंगचे काम करताना २८ वर्षीय एक कामगार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शहरातील पाग पॉवर हाऊस येथे घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजीव रामसुरेश कुमार (२८, खेर्डी-भुरणवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबतची खबर रवळू ज्योतीबा गुरव यांनी दिली. रवळू गुरव यांनी घेतलेल्या पाग पॉवर हाऊस येथील इमारतीचे आर.सी.सी. सेट्रिंगचे काम संजीव करत होता. यावेळी त्याचा पाय घसरल्याने अखेर तो इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन जमिनीवर कोसळला. गंभीररित्या दुखापत झाल्याने रवळू गुरव याच्याकडे कामास असलेला अमर विश्वकर्मा याने त्याला उपचारासाठी कामथे रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.