रत्नागिरी:- आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर टिके येथील 24 वर्षीय प्रणव सनगरे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
तालुक्यातील वळके येथील एका तरुणाने रत्नागिरी आरटीओ येथील कार्यालयासमोरील रेल्वे समोर स्वतःला झोकून देत आत्म्याहत्या केली. 25 सप्टेंबर रोजी हा 22 वर्षीय तरुण दुपारी 12 वाजण्याच्या या ठिकाणी गेला. त्याने स्वतः ला रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केली. राजेंद्र रवींद्र सावंत (22, वळके बौद्धवाडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे . काल ज्या तरुणाने आत्महत्या केली त्याच पद्धतीने आणि त्याच ठिकाणी या तरुणाने आत्महत्या केली. या अपघाताची खबर तरुणाचे काका शुभानंद माणिक सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दिली.









