समुद्राच्या तळाशी रुतलेल्या नावेद-2 नौका बाहेर काढण्यासाठी संयुक्त ऑपरेशन 

रत्नागिरी:- समुद्राच्या तळाशी रुतलेल्या जयगड येथील नावेद नोकचा शोध घेण्यासाठी पोलीस, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कोस्ट गार्ड हे तीन विभाग संयुक्तरित्या ऑपरेशन राबवण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे नौकेवरील मृत खलाषांच्या कुटुंबियांना मदत आणि नौका मालकाला भरपाई देण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी आक्रमक भूमिका घेतली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यावर आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जयगड बंदरातून मासेमारीसाठी गेलेली नावेद २ ही मासेमारी नौका बेपत्ता झाली होती स्थानिक मच्छीमार खाजगी स्कुबा ड्रायव्हर च्या मदतीने सर्च केल्यानंतर किनाऱ्यापासून दोन बैलांचा वर समुद्राच्या तळाशी एक बोट वाळूत रुतले निदर्शनास आले आहे यानंतर आता पोलिसांनी ही तपासाची गती वाढविली आहे. समुद्रातील बोट काढण्याची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची आहे याबाबत जयगड पोलिसांनी मेरिटाइम बोर्डाची संपर्क साधला आहे. तर कोस्टगार्ड च्या मदतीने पुन्हा शासकीय डायवर च्या मार्फत सर्च करण्याची मागणी पोलिसांनी दलाकडे केले आहे. गुरुवारी त्याबाबतचे पत्र तटरक्षक दलाच्या मुख्य कार्यालयाला पाठविण्यात आले. पोलीस, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कोस्ट गार्ड हे तीन विभाग संयुक्तरित्या ऑपरेशन करून नावेद ला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. बेपत्ता व्यक्ती याच बोटीत अडकलेले असल्यास त्यांचाही शोध घेतला जाणार आहे.

स्थानिक मच्छिमार यांची जयगड येथे बैठक झाली असून त्यात प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या नौकेला अपघात झाला असून त्यात खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणे आवश्यक्य आहे. या बाबत मालवाहतूक करणाऱ्या खासगी कंपनीने त्या खलाशी कुटुंबाला मदत दिली पाहिजेत. तसेच नौकेचे झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी कंपनीकडे करण्याचा निर्णय मच्छिमारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत जयगड ग्रामपंचायततर्फे पोलीस, खासगी कंपनी यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.