सप्तलिंगी नदीत बुडालेला तरुण दुसऱ्या दिवशीही बेपत्ताच; शोधकार्य सुरू

देवरुख:-देवरुख नजीकच्या पूर झेपलेवाडी येथे सप्तलिंगी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा मृत्यू तर एका युवकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील तिसऱ्या बेपत्ता झालेल्या तरुणाचा मात्र दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या हाती निराशाच आली आहे.

गणेशोत्सवासाठी पूर झेपले वाडी येथील काही चाकरमानी गावी आले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास यातील काही चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थ असे एकूण सहा जण सप्तलिंगी नदीतील जांभळीचे उतरण या ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. या ठिकाणी नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे .दरम्यान या सहाजणांपैकी तीन जणांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडू लागले. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातील दोघांना पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र त्यातील तिसरी व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर बेपत्ता झाली. पाण्याबाहेर काढण्यात आलेल्या दोघांना देवरूख ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी आणण्यात आले त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यातील अशोक सोनू झेपले यांना मृत घोषित करण्यात आले तर हर्ष संजय घाटकर या युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले दरम्यान या घटनेची माहिती परिसरात पसरताच सर्व ग्रामस्थ, राजू काकडे हेल्प ॲकॅडमी चे कार्यकर्ते यांनी बेपत्ता झालेल्या संजय घाटकर या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अगदी काळोख होईपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. मात्र संजय घाटकर सापडून आले नाहीत अंधार झाल्याने अखेर बुधवारी ही शोधमोहीम सायंकाळी सात वाजता थांबविण्यात आली. गुरुवारी सकाळपासून पुन्हा एकदा संजय घाटकर यांचा शोध ग्रामस्थांनी सुरु केला याही दिवशीही ग्रामस्थांच्या मदतीला राजू काकडे हेल्प ॲकॅडमी चे कार्यकर्ते धावून गेले या दिवशी अगदी सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती घटनास्थळापासून साधारणपणे तीन ते चार किमी अंतरापर्यंतचा नदी परिसर या शोध मोहिमेदरम्यान पिंजून काढण्यात आला मात्र दुसऱ्या दिवशीही संजय घाटकर हे मिळून आलेले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पडली आहे.