रत्नागिरी:- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरावर व जिल्हा परिषद गट स्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण 24 मार्चला रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सकाळी 11 वाजता पालकमंत्री उदय सामंत याच्या हस्ते होणार आहे. मागील तिन वर्षातील 122 ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षांतर्गत हे पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची नावे जाहीर करण्यात आली असून त्याचे वितरण केले जाणार आहे. 2019-20 मध्ये जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती ः नाचणे, पोफळी, अंजनवेल. 2020-21 व 2021-22 जिल्हास्तर ः कोंडअसुर्डे, खामशेत, मोरवणे. विशेष पुरस्कार (2019-20) ः सोवेली ग्रामपंचायत (स्व. वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व्यवस्थापन), कोंडअसुर्डे (डॉ. बाबासाहेब आंबडेकर पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन पुरस्कार), तेरेवायंगणी (स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार). विशेष पुरस्कार 2020-21 व 2021-22 ः टेंभ्ये (स्व. वसंतराव नाईक), अणसुरे (डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुरस्कार), सांगवे (स्व. आबासाहेब खेडकर).
जिल्हा परिषद गट स्तरावरील 2019-20 वर्षातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती ः तुळशी, सोवेली (मंडणगड), चिखलगाव, तेरेवायंगणी, चंद्रनगर, कादिवली, लाडघर, पिसई (दापोली), जामगे, बोरघर, तळघर, काडवली, शिंगरी, शिव बुद्रुक, शिरगाव (खेड), पोफळी, दळवटणे, आबीटगाव, चिवेली, कोंडमळा, कामथे बुद्रुक, भिले, चिंचघरी, दुर्गवाडी (चिपळूण), अंजनवेल, कौंढर काळसूर, पाटपन्हाळे, शिवणे (गुहागर), वांद्री, कोसुंब, कोंडअसुर्डे, मोर्डे, मावळंगे, तुरळ, चाफवली (संगमेश्वर), मिरजोळे, नाचणे, पावस, आगरनरळ, देऊड, धामणसे, कासारवेली, निवळी, कोळंबे, टेंभ्ये (रत्नागिरी). गोळवशी, गवाणे, खोरनिनको, देवधे (लांजा), कोंडयेतर्फे सौंदळ, गोवळ, निवेली, भू, ताम्हाणे, ओझर (राजापूर). 2020-21 व 2021-22 वर्षातील पुरस्कार असे ः माहू-बोरघर, शिरगाव (मंडणगड), रुखी, उसगाव, नवशी, कर्दे, केळशी, पिसई (दापोली), आवाशी, तुळशी, वडगाव, लोटे, भिलारे आयनी, शिर्शी, भोस्ते (खेड), सावर्डा, मुंढेतर्फे चिपळूण, पिंपळी खुर्द, तनाळी, वहाळ, कुशिवडे, केतकी, मोरवणे, कापसाळ (चिपळूण), खामशेत, कोतळूक, अडूर, आबलोरी (गुहागर), कोंड असुर्डे, सांगवे, चोरवणे, बामणोली, राजवाडी, लोवले, कासे (संगमेश्वर), टेंभ्ये, नाणीज, मिरजोळे, बसणी, मावळंगे, कुवारबाव, आगरनरळ, तरवळ, फणसोप (रत्नागिरी), हरर्दखळे, तळवडे, भडे, वनगुळे (लांजा), अणसुरे, भालावली, कोंडयेतर्फे सौदळ, ताम्हाणे, देवाचेगोठणे, ओझर (राजापूर).