रात्री 10 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत लागू राहणार संचारबंदी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नव्या बदलानुसार रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहिर केले आहे.
यापूर्वी जिल्ह्यात रात्रौ 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती त्या आदेशामध्ये बदल करुन जिल्ह्यात संचारबंदीची वेळ रात्रौ 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आली.
सदर आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात आजपासून दिनांक 24 फेब्रुवारी 2021 पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहील. असे आदेशात म्हटले आहे.