संगमेश्वर:-रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यानजीक ट्रक व दुचाकी यांच्यात आज गुरूवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याचे समजते. जखमी दुचाकीस्वराचे नाव समजू शकलेले नाही.
या अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तर दाभोळे येथील मृत्युंजय ग्रुपचे प्रतिनिधी अजिंक्य दाभोळकर, रोशन कांबळे, काका हिरवे यांनीही घटनास्थळी भेट दिली.