श्वसनाच्या त्रासाने पुण्यातील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसंत रुधुनाथ जाधव (वय ६४, सध्या रा. बिच फ्रन्टव्हिला हॉटेल, गायवाडी-मालगुंड. मुळ ः रा. विठ्ठलनगर, सुतावाडीरोड, पासन, हवेली पुणे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास मालगुंड आरोग्य केंद्रात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसंत जाधव यांना शनिवारी (ता. २२) साडे अकराच्या सुमारास हॉटेलमध्ये बसलेले असताना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.