रत्नागिरी:- झोपेतून उठल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अभिषेक संजय चव्हाण (वय ३०, रा. मिरजोळे-हनुमान नगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी सव्वासात च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक हा सकाळी पावणेसात वाजता झोपेतून उठला त्याला श्वसनाचे त्रास जाणवू लागल्याने त्याला उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.