रत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आलेला चालक अचानक बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
सचिन बबन कापसे (वय ३८, रा. जत, ता. जत, जि. सांगली) असे मृत तरुण चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक सचिन कापसे हे खासगी वाहन घेऊन गुरुवारी (ता. १३) श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते गाडी मालकासह चालत गाडीजवळ जात असताना अचानक त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांना मालगुंड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









