रत्नागिरीत आंबा उत्पादकांकडून जोरदार आंदोलन
रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी 2015 सालापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आला आहे. पण या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी बाबत निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु या शेतकऱ्यांविषयी शासनाने कोणताही कर्जमाफी चा निर्णय केला नाही, किंवा सहानुभूतीही दाखवली नाही. विविध माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार आणि मंत्री यांनी शेतकऱ्यांना आम्ही सत्तेवर आल्यावर सातबारा कोरा करून अशी आश्वासने दिली. मात्र आजपर्यंत फसवणूक झालेल्या या बागायतदार, शेतकऱ्यांनी आम्हाला कमी लेखू नये असा इशारा दिला आहे.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, मर्यादित, रत्नागिरी यांनी शेतकरी आणि बागायतदारांच्या, तसेच मच्छिमार व्यवसायिक व विविध सामाजिक संघटना यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी मंगळवार 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी बागायतदार संघटनेचे नेते प्रकाश उर्फ बावा साळवी, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राउत, उपनेते व माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, त्याबरोबर विविध आंबा बागायतदार संघटनांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोकणातील शेतकरी 2015 पासून निसर्गाया अवकृपेमुळे अडाणीत आला आहे. त्याता मागील कोरोनाकाळात आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या येथील बागायतदारांना वास्तविक शासनाने त्यावेळी कर्जमाफा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु शेतकऱ्यांविषयी शासनाने कोणताही कर्जमाफीचा विचार केला नाही, वा सहानुभूतीही दाखवली नाही. विविध माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार आणि मंत्री यांनी शेतकऱ्यांना आम्ही सत्तेवर आल्यावर सातबारा कोरा करून अशी आश्वासने दिली. पण प्रत्यक्षात आजपर्यंत कोणाही सातबारा कोरा झाला नाही. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
या मोर्चाचा उद्देश आंबा उत्पादक आणि शेतकऱ्यांया समस्या शासनापर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आंबा खरेदी आणि भाडे आहे. सन 2019 पासूनची आंब्याची खरेदी आणि बाजारपेठ व्यवस्था पूर्ववत करावी. सध्याच्या अनियमित पेमेंटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेती पंपांसाठी मोफत वीज द्यावी आणि शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे.
शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे. तसेच, आंब्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने आधारभूत किंमत निश्चित करावी. फळपीक विमा योजना प्रभावीपणे राबवून नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत करावी. कोकण पट्टा कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावे. कीटकनाशक आणि खतांच्या वाढलेल्या किमतींवर नियंत्रण ठेवावे, आणि ती माफक दरात उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही राष्ट्रीयकृत विमा कंपनीने शेतकऱ्यांना योग्य विमा संरक्षण द्यावे. महावितरणने शेतकऱ्यांवर लादलेले स्मार्ट प्रीपेड मीटर तातडीने रद्द करावे अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरूध्द दाद मागण्यासाठी करण्यात आलेल्य़ा या आंदोलनात रत्नागिरी जिल्हा हापुस आंबा उत्पादक संघ, पावस परिसर आंबा उत्पादक संघ, मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ आडिवरे, रवळनाथ आंबा उत्पादक संघ करबुडे, अन्य सामाजिक आणि मच्छी उत्पादक संघटना, युनिटी ऑफ मुल निवासी समाज रत्नागिरी, ओबीसी संघर्ष समिती या संघटनांचा सहभाग होता. शासनाने वरील समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलावे अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.