रत्नागिरी-:- पूर्व उच्च्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदचे १३ हजार ४०३ विद्यार्थी बसणार आहेत. एकूण १३९ केंद्र असणार आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सध्या विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षेवर भर दिला जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी बसवले जात आहेत. त्याला यशही आलं आहे. शिष्यवृत्त्ती गुणवत्ता यादीत जि.प.चा टक्का वाढला आहे. २०१८ मध्ये ३१ विद्यार्थी, २०१९ ला ३७ विद्यार्थी, २०२० ला ५६ विद्यार्थी, २०२१ ला ८९ विद्यार्थी, तर २०२२ ला १३० विद्यार्थी यादीत झळकले होते.
यावर्षी ही परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासाठी पाचवी शिष्यवृत्त्तीला ८ हजार ६७४ व आठवीसाठी ४ हजार ७२९ विद्यार्थी बसणार आहेत. यासाठी एकूण १३९ केेंद्र असणार आहेत. पाचवीला मंडणगड ३८८, दापोली ११०९, खेड ११०४, चिपळूण ११६९, गुहागर ७१२, संगमेश्वर १०७७, रत्नागिरी ७०९, लांजा ६१७, राजापूर ७८९ असे एकूण ८ हजार ६७९ विद्यार्थी बसले असून यासाठी ९१ केंद्र आहेत. तर आठवला मंडणगड २३६, दापोली ७०४, खेड ६६४, चिपळूण ९०३, गुहागर ३४६, संगमेश्वर ४७८, रत्नागिरी ७७९, लांजा २३९, राजापूर ३८० असे एकूण ७ हजार ७२९ विद्यार्थी बसणार असून ४८ केेंद्र असणार आहेत. परीक्षेसाठी नियोजन पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने पेपर सोडवावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी एस.जे.मुरकूटे यांनी केले आहे.