रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या शिवाजीनगर येथे गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास तीन चारचाकी वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन गाड्या एकमेकावर आदळल्या. अपघातानंतर या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
साळवी स्टॉप येथून मारुती मंदिर कडे येणारी एक कार प्रथम एका ओमनी वर आदळली. यानंतर या ओमनीने पुन्हा एका कारला धडक दिली. या अपघातात ओमनी आणि कार या दोन गाड्या दुभाजकावर जाऊन आदळल्या. यात तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल होत पंचनामा करून रस्ता मोकळा करण्याचे काम केले.









