रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार दि . २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली. निखिल दीपक चव्हाण ( २४, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. निखील हा टेम्पोचा व्यवसाय करीत असे. रविवारी रात्री टेम्पोतून आंब्याच्या पेट्या ट्रान्सपोर्टला देऊन घरी जेवण झाल्यानंतर तो झोपी गेला होता.
सोमवारी सकाळी निखिलच्या आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे तिला दिसून आले. तेव्हा निखिलच्या भावाने त्याला तातडीने निर्मल बालरुग्णालय येथे नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला परकार हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. परकार हॉस्पिटलमधून निखिलला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निखिलला तपासून मृत घोषित केले.