निवळी येथील माहेर संस्थेत खाऊचे वाटप
रत्नागिरी:- शिवसेना रत्नागिरी तालुका महिला आघाडीने पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस निवळी येथील माहेर संस्थेच्या महिला आणि मुलींसमवेत साजरा केला. सुमारे साठहून अधिक मुलींना गरजेनुसार लागणाऱ्या वस्तू वितरित करण्यात आल्या. तसेच त्यांना खाऊ वाटप केले गेले. या उपक्रमामुळे आनंदीत झालेल्या मुलींनी मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम शिवसेना महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, विभाग प्रमुख विद्या बोंबले, अपर्णा बोरकर, साक्षी कुमठेकर, शुभांगी पांड्ये, रिया साळवी, मेघना पाष्ट्ये, प्रज्ञा शिवगण, संस्कृती पाचकुडे आदि उपस्थित होते.