खेड:- शिवसेनेला खिंडार पडण्याची मालिका सुरूच असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मातोश्रीवर बोलवून सांगितलं की, मीडियासमोर जायचं नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला,’ असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.