रत्नागिरी:- शहरानजीकच्या शिरगाव येथील तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.१५ वा. सुमारास घडली आहे. योगेश सुनील आंबेकर (३६, रा. कुंभारवाडी शिरगाव, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
योगेश याला फिट येण्याचा त्रास होता. रविवारी तो घरी असतानाही त्याला फिट आल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









