शिरगाव-तिवंदेवाडी येथे विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजीकच्या शिरगाव-तिवंदेवाडी येथे विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 ते रात्री 9.30 वा.सुमारास घडली आहे.याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फिरदोस मुस्तफा हुश्ये (28,रा.अजिजा अपार्टमेंट शिरगाव तिवंदेवाडी,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याबबत रशिदा हनिफ पागरकर (55,रा.किर्तीनगर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली.दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.