शिरगावमध्ये सरपंच महाविकास आघाडीचा तर बहुमत शिंदे गटाकडे

रत्नागिरी:- बहुचर्चित शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली. सरपंच पदावर महा विकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी या 165 मतांनी विजयी झाल्या. मात्र 17 पैकी 15 जागा जिंकत शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले.

शिरगावमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून फरिदा रज्जाक काझी व अल्ताफ जाफर संगमेश्वरी हे विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री गटातून रहिमत अलिमियाँ काझी व सना अजिम चिकटे,  सर्वसाधारण गटातून शकिल इस्माईल मोडक, सचिन सुरेश सनगरे , मयुर कृष्णा सांडीम, उझेर महमंदअली काझी, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शाहीन इम्तियाज मुजावर, कांचन काशिनाथ गोताड, अंकिता अंकुश सनगरे, खुशबू आसिफ काझी, स्नेहा प्रथमेश भरणकर, जान्हवी पंकज कदम, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गटातून मिथिला ओंकार शिंदे, निरजा निखिल शेट्ये हे उमेदवार विजयी झाले.

सरपंचपदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी यांना 2067 मते मिळवून त्या विजयी झाल्या.  अपक्ष उमेदवार श्रध्दा दीपक मोरे या 1902 मते घेऊन दुसर्‍या क्रमांकावर तर बाळासाहेबांची शिवसेनेच्या साक्षी परेश कुमठेकर या 1763 मते घेऊन तिसर्‍या स्थानावर फेकल्या गेल्या