रत्नागिरी:- कोकणात शिमगोत्सवात रत्नागिरी विभागातून मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी 50, तर परतीसाठी 54 जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्याला कोकणातील चाकरमान्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत एसटीने दिलेल्या सुविधेचा लाभ घेतला.
कोकणात शिमगोत्सव उत्साहात साजरा होत असल्याने चाकरमान्यांची पावले गावाकडे वळू लागतात. यासाठी एसटीने जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध केली होती. मुंबईतून येणार्या व परत जाणार्या प्रवाशांसाठी जादा वाहनांची उपलब्धता राज्य परिवहन रत्नागिरी विभागाने केली आहे. मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी 50, तर परतीसाठी 54 जादा गाड्या सोडण्यात आल्या. अशा 104 गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी करण्यात आली होती.
20 मार्चपासून जादा गाड्या सोडण्यात आल्या. रत्नागिरी विभागातील नऊ आगारांत जादा गाड्यांची सुविधा करण्यात आली. परतीसाठीही जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. मुंबई, बोरीवली, नालासोपारा, विठ्ठलवाडी, ठाणे, परळ, भांडूप, स्वारगेट, कल्याण, भिवंडी, विरार, चिंचवड येथून जादा गाड्या सोडण्यात आल्या. परतीसाठीही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. 20 मार्चपासून दापोली आगारात 13, खेडमध्ये 8, चिपळुणात 6, गुहागरात 2, देवरुखात 3, रत्नागिरीत 5, लांजा 4, राजापुरात 3, तर मंडणगडात 6 मिळून एकूण 50 जादा गाड्या सोडण्यात आल्या. परतीसाठी 25 मार्चपासून जादा गाड्या सोडल्या. दापोलीतून 15, खेड 9, चिपळूण 6, गुहागर 2, देवरुख 3, रत्नागिरी 6, लांजा 4, राजापूर 3, मंडणगडातून 6 गाड्या मिळून एकूण 54 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले.