शिपोशी बौध्दवाडीत स्फोट; एक ठार

लांजा:- स्फोट होऊन शिपोशी बौध्दवाडी येथील ४५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वा घडली आहे.  

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , शिपोशी येथील रमेश बंडू मोहिते (वय -४५) हे विवाहित असून तो आपल्या कुटूंबियांपासून अलिप्त एका खोपित राहतो. दुपारी १२.३० वा. दरम्याने रमेश राहत असलेल्या खोपितून जोरदार स्फोटाचा आवाज आल्याने रमेशचा भाऊ यांनी खोपीकडे धाव घेतली असता त्यावेळी रमेश जखमी अवस्थेत छातीवर हात धरून खोपी बाहेर आला. भाऊ प्रकाश याने त्याला सावरले व आपल्या घरी घेवून गेला. छातीला जोरदार इजा झाल्याने छातीतून रक्त वाहत असल्याने रक्तस्ञाव थांबविण्यासाठी कापड त्याच्या मान छातीवर दाबून ठेवली होती.  रक्तस्ञाव थांबत नसल्याने त्याला उपचारासाठी हळविण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

झालेल्या घटनेची खबर शिपोशी पोलीस पाटील यांना देण्यात आल्यानंतर पोलीस पाटील यांनी लांजा पोलीस स्थानकात घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय धुमासकर, हेडकाँन्टेबल अरविंद कांबळे, नितीन पवार, राजेश वळवी, नरेश कदम, चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या स्फोटाविषयी अधिक तपास अधिक तपास करण्यात येत आहे. या घडलेल्या घटनेची खबर रमेश याचा भाऊ प्रकाश मोहिते यांनी लांजा पोलीसात दिली आहे.