रत्नागिरी:- रत्नागिरीतील काही नूतन शिधापत्रिकाधारकांना म्हणजे ज्यांची शिधापत्रिका 2019 नंतर अर्थात 2020 मध्ये तयार झाली आहेत. ग्राहकांना त्या नव्याने दिलेल्या शिधापत्रिकेचा अजून धान्य लाभ घेता आलेला नाही. शिधापत्रिकाधारक रेशन दुकानावर गेले असता त्या शिधापत्रिकांना वरून ऑनलाईन मंजुरी अजून पर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे देण्यात आलेली शिधापत्रिका रेशन घेण्यासाठी निरुपयोगी ठरत असून ‘विहीर खणली, पण त्यात पाणीच नाही’ अशी अवस्था प्रशासनाची दिसत आहे.
यासंदर्भात येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे तहसिलदार शशिकांत जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. रत्नागिरी मनसे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, मनसे रत्नागिरी शहर अध्यक्ष सतीश राणे यांच्या मार्गदर्शनाने मनसे रत्नागिरी उपशहर अध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ यांच्या नेतृत्वाखाली सोमवार निवेदन दिले. सन 2019 नंतर च्या शिधापत्रिकांना लवकरात लवकर ऑनलाईन मंजुरी मिळून शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.
रत्नागिरीतील काही नूतन शिधापत्रिकाधारकांना म्हणजे ज्यांची शिधापत्रिका 2019 नंतर अर्थात 2020 मध्ये तयार झाली आहेत. त्यांना अजून पर्यंत त्या शिधापत्रिकेचा धान्यलाभ घेता आलेला नाही. शिधापत्रिकाधारक रेशन दुकानावर गेले असता त्या शिधापत्रिकांना वरून ऑनलाईन मंजुरी अजून पर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे देण्यात आलेली शिधापत्रिका रेशन घेण्यासाठी निरुपयोगी ठरत आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्का साठी खूप तडजोड करतांना पहावयास मिळते आहे. सामान्य जनतेस शिधापत्रिकेच्या मंजुरी चौकशी करिता सारखे तहसीलदार कार्यालयाचे चकरा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
लवकरात लवकर शिधापत्रिका धारकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळण्याकरिता शिधापत्रिकेस ऑनलाईन मंजुरी मिळावी. यासाठी मनसे रत्नागिरी शहर तर्फे हे निवेदन रत्नागिरी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शशिकांत जाधव यांना देण्यात आले. त्यावर लवकरात लवकर वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल असे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जाधव यांनी सांगितले. त्यावेळी शहर अध्यक्ष सतीश राणे, उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, विभाग अध्यक्ष गजानन आईर, विभाग अध्यक्ष राहुल खेडेकर, महाराष्ट्र सैनिक आकाश फुटक, रत्नागिरीकर (शिधापत्रिकाधारक) संजय आग्रे, हृतिक शिंदे तसेच इतर मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.