रत्नागिरी:- शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात तब्बल १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजार ४१ स्वयंपाकी व मदतनिसांना लाभ होणार आहे. १ एप्रिलपासून त्यांना २ हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे.
शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेमार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातो. यासाठी शाळांना निधीही देण्यात येत असतो. जिल्ह्यातील स्वयंपाकी व मदतनीस हे शाळांमधून पोषण आहार शिजवणे, आहार वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे व इतर अनुषंगिक कामे करतात. पोषण आहार योजनेच्या प्रभावी पुढ अंमलबजावणीमध्ये विश स्वयंपाकी व मदतनीस यांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ८८७ शाळांमधील ४ हजार ४१ स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना केंद्र शासनाकडून ६०० रुपये व राज्य शासनाकडून ९०० रुपये असे री मिळून १ हजार ५०० रुपये मानधन दरमहा मिळत होते. शेष हे मानधन दहा महिन्यांसाठी दिले जाते. त्यात वाढ करण्याची मागणी संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंपाकी व मदतनीस सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार शिजवून देण्याचे काम करत आहेत. हे काम अतिशय जोखमीचे असल्याने स्वयंपाकी व मदतनीस यांना डोळ्यात तेल घालूनच भात शिजवावा लागत आहे. शासनाने १ एप्रिलपासून दीड हजार रुपये मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शालेय पोषण आहार शिजवून देणार्या स्वयंपाकी व मदतनिसांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.