रत्नागिरी:-समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. महामंडळाकडून थेट कर्ज योजना रु.1 लक्ष ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे. त्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 1 लाखापेक्षा जास्त नसून जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. कर्ज बिन व्याजी असून कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षे असणार आहे.
कर्ज मंजुरीनंतर शासकीय जामीनदार व इतर वैधानिक दस्तावेज आवश्यक आहेत. कर्जासाठीचे अर्ज रु. 10/- मध्ये उपलब्ध आहे. महामंडळाकडून 20 टक्के बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. यामध्ये 75 टक्के बँक सहभाग व 20 टक्के राज्य महामंडळाचा सहभाग, 5 टक्के लाभार्थ्याचा सहभाग आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे. अर्जाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदाराने कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर माहितीकरिता जिल्हा व्यवस्थापक प्रिती पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.