शहरातील पोषण आहाराचा ठेकादेखील बचतगटांच्या हाताबाहेरच

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेने शहरातील शाळांना पोषण आहार पुरवण्यासाठीचा ठेका देण्याची तयारी सुरु केली आहे. निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली असून याचा फटका स्थानिक महिला बचत गटांना बसणार आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळत असतानाच शहरातील बचत गटातील महिला बेरोजगार होणार आहेत. निविदा प्रक्रियेचे निकष पाहता त्याची पुर्तता स्थानिकांकडून होणे अशक्य असल्याने परजिल्ह्यातील संस्था अग्रेसर आहेत.

गेली अनेक वर्ष मुलांना दर्जेदार आहार देणार्‍या महिला बचत गटातील महिलांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. याची दखल स्थानिक लोकप्रतिनिधी घेणार का असा प्रश्‍न उपस्थित केलो जात आहे. शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर तत्कालीन सरकारने महिला बचत गटाच्या सक्षमिकरणासाठी शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य दिले. त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरु झाली. घरातील अन्न शिजवणार्‍या माहिला शाळकरी विद्यार्थ्यांना घराप्रमाणे दर्जेदार जेवण देत आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने त्यात खंड पडला. आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर गेले दोन वर्ष बंद असलेली रोजीरोटी पुन्हा मिळेल अशा आशेवर असलेल्या रत्नागिरी शहरातील महिला बचत गटांच्या महिलाची रोजीरोटी शासनाच्या आदेशाने हिरावून घेतली आहे.  शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी बचत गट ऐवजी खाजगी संस्थाची निवड केली जाणार आहे. रत्नागिरी नगरपालिकेकडून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा भरणार्‍यांमध्येही परजिल्ह्यातील संस्थांचा समावेश आहे. रत्नागिरी शहरात 7 हजार 500 विद्यार्थी आहे. पोषण वितरण सुरळीत करण्यासाठी तीन संस्थांना ते विभागून दिले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आवश्यक किचनची पहाणी शिक्षण विभागाकडून केल्याची माहिती पुढे आली आहे. संस्थेची नेमणुक करण्यात येणार असल्याचे बचत गटाच्या महिलांची रोजी रोटी हिरावली जाणार हे निश्‍चित झाले आहे. आधीच कोरोनामुळे नोकर्‍या, व्यावसायांवर गंडातर आले असतानाच बेरोजगांमध्ये भर पडणार आहे.