सेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उप जिल्हाप्रमुख बाबू म्हाप, कांचन नागवेकर यांना पदावरून हटवले

रत्नागिरी:- माजी मंत्री उदय सामंत यांना जाहीर समर्थन करणाऱ्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. यात उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आणि कांचन नागवेकर यांचा समावेश आहे.

नूतन शहर प्रमुख म्हणून प्रशांत साळुंखे, उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रकाश रसाळ व महिला संघटक म्हणून साक्षी रावणांग यांची निवड करण्यात आली आहे.